भ्रष्टाचाराबद्दल जनतेने अजूनही काँग्रेसला माफ केले नाही: मायावती

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांची मोट बांधण्याचा जोरदार प्रयत्न काँग्रेसकडून सुरु आहे. विशेतः कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यामध्ये सोनिया गांधींनी मायावतींशी साधलेली जवळीक पाहून ‘महाआघाडी’बाबतचे अनेक तर्क वितर्क लावले गेले परंतु आज बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या वक्तव्यामुळे संभाव्य महाआघाडीच्या भविष्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी पत्रकार परिषदेमध्ये काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. त्या म्हणाल्या, “बसपा कोणत्याही परिस्थितीमध्ये राजस्थान व मध्य प्रदेश निवडणुकांमध्ये काँग्रेसशी हात मिळवणार नसून, काँग्रेसचे मित्रपक्षांप्रती असलेले वर्तन हे अतिशय मुजोर आहे. काँग्रेसला आपण स्वबळावर भाजपाला सत्तेतून खाली खेचू शकू असा अहंकार आला असला तरी जनतेने मात्र आजही काँग्रेसला त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल माफ केलेले नाही.”

-Ads-

मायावतींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चाना उधाण आले असून महाआघाडी बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

#मुद्दा: मायावती – अजित जोगींच्या युतीचे भवितव्य काय?


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)