राज्याबाहेरील लोकांना वाटतंय महाराष्ट्र जलमय : धनंजय मुंडे

जालना: कमी पावसामुळे राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळून जात असताना राज्य सरकारकडून फक्‍त विविध घोषणांचा पाउस पाडला जात आहे. प्रत्यक्षात कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाहीत. अद्यापही अनेक दुष्काळग्रस्त भागात टॅंकरची सोय केलेली नाही. पण जलयुक्त शिवार योजनेची मोठी जाहिरातबाजी केली जात आहे.

या जाहिरातबाजीमुळे राज्याबाहेरील लोकांना “महाराष्ट्र जलमय’ झाला आहे, असे वाटतेय. मात्र, प्रत्यक्षात महाराष्ट्राची प्रगती पाण्याखालीच गेली आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या दुस-या टप्य्यातील सभा आज जालना जिल्ह्यातील घनसांगवी येथे पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, फौजिया खान, आमदार बाबाजानी दुराणी आदी उपस्थित होते.

मुंडे म्हणाले, आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रभर आसूड घेऊन फिरत होते. कर्जमाफी देता की जाता, असे म्हणत होते. आता लाचारी पत्करून सरकारमध्ये असल्याने त्यांना काही देता पण येत नाही आणि जाता पण येत नाही, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष शेतकऱ्यांना साले म्हणतात. आंदोलने चिरडण्यासाठी शेतकऱ्यांना पायाखाली गोळी मारायला हवी होती, अशी वाच्यता करतात. आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरून दाखवाच, नाही लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली तर सांगा, असा इशारा मुंडे यांनी नाव न घेता रावसाहेब दानवे यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)