पेंटॅगॉनला प्रमुखच नाही !

वॉशिंग्टन: इराणबरोबर निर्माण झालेली युद्धसदृश स्थिती आणि अन्य संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेच्या संरक्षण विभागाला मात्र अद्याप त्यांचा प्रमुखच नेमण्यात आलेला नाहीे. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाला सध्या वेगळ्याच स्थितीचा सामना करावा लागत आहे. अध्यक्ष ट्रम्प यांनी संरक्षण मंत्रीपद गेले अनेक दिवस रिकामेच ठेवले असून सध्या त्याची सूत्रे स्वत: ट्रम्प हेच सांभाळत आहेत.

अफगाणिस्तानात नेमण्यात आलेले जादा लष्कर, अमेरिका-मेक्‍सिको सीमेवर निर्माण झालेला तणाव, उत्तर कोरियाबरोबर निर्माण झालेला वाढता तणाव अशा साऱ्या घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांनी अद्याप संरक्षण मंत्री का नेमलेला नाही याचे कोडे अजून कोणालाच उमगलेले नाही. मध्यंतरी काही काळापुरती पॅट्रिक शनहान यांची हंगामी संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पण तेही या पदावरून पायउतार झाले आहेत. डिफेन्स सेक्रेटरी हे अमेरिकेच्या प्रशासनातील एक महत्वाचे व संवेदनशील पद मानले जाते. पण या पदावर कोणाची कायम स्वरूपी निवडच न होणे हे जरा विचीत्रच मानले जात आहे. ट्रम्प प्रशासनातील गोंधळाचेच हे प्रतिक आहे अशी टिका विरोधकांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here