“पेन्टा-3′ डोसने चिमुकलीचा मृत्यू

लातूर: मौजे चिलखा (ता. अहमदपूर) येथील संध्याराणी ज्ञानेश्‍वर शिंदे (4 महिने) या चिमुकलीला “पेन्टा-3’चा डोस देण्यात आला. हा डोस देताच ती बेशुद्ध पडली. दरम्यान, सोमवारी रात्री लातूर येथील शासकीय वैद्यकीय रूग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. हा मृत्यू “पेन्टा-3’च्या डोसमुळे झाला असून या प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुलीचे पालक ज्ञानेश्‍वर शिंदे यांनी केली आहे.

ज्ञानेश्‍वर शिंदे यांचे हे चिलखा येथे वास्तव्यास आहेत. त्यांना संध्याराणी नावाची 4 महिने वयाची मुलगी होती. दरम्यान, 7 जानेवारीला दुपारी अहमदपूर येथील ग्रामीण रूग्णालयात तिला तिसरा डोस म्हणून पेन्टा-3 तोंडावाटे दिले. हा डोस देतास दोन तासांनी बाळाला अस्वस्थ वाटू लागले. बाळाची प्रकृती अधिक खालावताच ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिथेच उपचार न करता बाळाला तात्काळ लातूरच्या शासकीय रूग्णालयात घेवून जा, असे सांगितले. तात्काळ लातूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचाराला बाळाने प्रतिसाद दिला नाही. कालच रात्री 11 वाजण्याच्या सुमारास उपचार करणाऱ्या डॉक्‍टरांनी बाळाचे निधन झाले, असे सांगितले.

दरम्यान, बाळाचा मृत्यू हा या डोसमुळे झाला नसून बाळाला दूध पाजल्याने दूध श्‍वसननलिकेत गेले असावे व त्या कारणाने मृत्यू झाला असावा, अशी शक्‍यता जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी व्यक्त केली. तरीही या बाळाचे शवविच्छेदन करण्यात आले असून याचा काय अहवाल येतो त्यावरून कारवाई करण्यात येईल, असे डॉ. ढगे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
1 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)