पश्‍चिम बंगालमध्ये अपंग बालकांना पेन्शन : ममता बॅनर्जी

कोलकाता: पश्‍चिम बंगाल मधील अपंगांना राज्य सरकार पेन्शन योजना सुरू करीत असून त्याचा राज्यातील किमान दोन लाख अपंगाना लाभ होईल असे त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. आज जागतिक अपंग दिनानिमीत्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की ज्यांना चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व आहे त्यांना राज्य सरकार दरमहा एक हजार रूपयांचे निवृत्तीवेतन देईल.

त्यासाठी राज्य सरकारने अडीचशे कोटी रूपयांची तरतूद केली असून त्यातून किमान दोन लाख अपंगांना लाभ होईल. सन 1992 सालापासून संयुक्तराष्ट्र संघा तर्फे जगभरात सर्वत्र हा दिवस जागतिक अपंग दिवस म्हणून पाळला जातो. यानिमीत्ताने अपंगांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जातो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)