बॅंक खाते व सिम कार्डसाठी आधार कार्डाची जबरदस्ती केल्यास 1 कोटीपर्यंत दंड

नवी दिल्ली: बॅंक खाते व सिम कार्डसाठी आधार कार्डाची जबरदस्ती केल्यास 1 कोटीपर्यंत दंड होणार आहे. आता बॅंकेत खाते उघडण्यासाठी वा सिम कार्ड घेण्यासाठी ओळखीचा वा निवासी पुरावा म्हणून आधार कार्ड देण्याची आवश्‍यकता नाही. जर आधार कार्डासाठी जबरदस्ती करण्यात आली, तर त्यासाठी दंडासोबतच 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आधार कार्डाच्या गोपनीयतेचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने बॅंका आणि टेलिकॉम कंपन्या यांना आधार कार्डाचा वापर करण्यावर अगोदरच बंदी घातली होती.

आधार कार्डावा वापर केवळ सरकारी जन कल्याणकारी योजनांसाठीच करता येईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते. आता केंद्र सरकारने त्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरिंग अँड भारतीय टेलिग्राफिक ऍक्‍टमध्ये सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सुधारित कायद्यानुसार आधार कार्डाची मागणी करणाऱ्या कर्मचाऱ्याला वा जबाबदार व्यक्तीला 3 ते 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आधार कार्ड द्यायचे वा नाही हे ग्राहकाच्या मर्जीवर अवलंबून राहील. आधार कार्डाचा वापर करणाऱ्या कंपनीकडून माहितीचा दुरुपयोग झाला वा ती फुटली तर 50 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 10 वर्षांपर्यत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. कायद्यातील सुधारणेला संसदेकडून मंजुरी मिळणे बाकी आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)