वाहतूक नियमभंग करणाऱ्या वडिलांना दंड 

भोपाळ – आज देशभरात प्रत्येकजण आपल्या मुलाला, वडिलांना किंवा नातलगाला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र मध्य प्रदेशात एका अधिकाऱ्याने कर्तव्यापुढे आपल्या वडिलांनाही सोडले नाही. नियमाचे पालन न केल्याबद्दल अधिकाऱ्याने आपल्या वडिलांनाच दंड ठोठावला. आपल्या वडिलांविरोधात कायदेशीर कारवाई करणाऱ्या या अधिकाऱ्याचं सध्या कौतूक केलं जात आहे.

उमरिया जिल्ह्यात सुभेदार पदावर असणाऱ्या अखिलेश सिंह यांनी कर्तव्य बजावत असताना फक्त आपल्या वडिलांची गाडी थांबवली नाही तर काचेवर लावण्यात आलेली काळ्या रंगाची फिल्मही काढून टाकली. अखिलेश सिंह यांचे वडील आरबी सिंह कटनी येथील बोहरीबंद तालुक्‍याचे एसडीओ आहेत. यामुळे कारवाई करताना इतर कर्मचारी थोडे धास्तावलेले होते. मात्र अखिलेश सिंह यांनी नियमाचे कारवाई करण्याचा आदेश दिला. त्यांनी कारवाई करताना कोणताही भेदभाव केला जाऊ नये असे स्पष्ट केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अखिलेश सिंह यांनी स्वत: काचेवरील काळी फिल्म काढून टाकली. मुलगा कारवाई करत असल्याचे पाहून आर बी सिंह यांनी देखील रोखलं नाही. त्यांनी 500 रुपयांचा दंडही भरला. आरबी सिंह उमरिया येथे आपल्या नातींना भेटण्यासाठी जात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)