साताऱ्यात 25 वाहनचालकांना दंड

पसार होवू पाहणाऱ्या ट्रिपलसीट दुचाकीला अपघात

सातारा – सातारा शहरातील विविध भागात नाकाबंदी तसेच वाहतुक तपासणी मोहीमा राबविण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केल्या होत्या. त्यानुसार दुपारी राधिका चौकात वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यावेळी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 25 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तपासणी दरम्यान, वाहतूक शाखेचे सपोनि सुरेश घाडगे यांच्यासमोरच एका ट्रिपल सीट दुचाकीचा अपघात झाला.

राधिका चौक परिसरातील नागरिकांनी याबाबत सातारा वाहतुक शाखेकडे वेळोवेळी तक्रारी केल्या होत्या. राधिका चौक हा शहरातील मुख्य चौक असून पोवई नाक्‍यावरील ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे चौकात वाहतुकीची वर्दळ मोठया प्रमाणात वाढली आहे. येथे कायमच छोटे मोठे अपघात होत असतात. परिसरातील नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेवून मंगळवारी राधिका चौकामध्ये सातारा वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश घाडगे यांनी स्वत: चौकात वाहन तपासणी सुरू केली. यामुळे वाहतुक नियमांचे पालन न करणाऱ्यांची भंबेरी उडाली. राधिका चौकामध्ये वाहतूक शाखेचे कर्मचारी अधिकारी पाहताच ट्रीपल सिट आलेल्या दुचाकीस्वारने पसार होण्यासाठी गाडी दामटली. परंतु, त्याचठिकाणी त्याच्या गाडीला अपघात झाला.

घाडगे यांनी यावेळी कसून वाहनांची तपासणी करताना वाहतुकीच्या नियमाचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांवर तसेच रिक्षाचालकांवर कारवाई केली. बेदरकार वाहन चालवणे, ट्रीपलसीट, मोबाईलवर बोलणे, फॅन्सी नंबर प्लेट, लायसन्स व कागदपत्रे जवळ न बाळगणे, रिक्षा चालक बॅच व ड्रेस न घालणे, तसेच फ्रन्ट सीटवर बसवून वाहतूक करणे अशा 25 जणांवर कारवाई केल्या. यापुढे सातारा शहरात विविध ठिकाणे व चौकात धडक कारवाया सुरूच ठेवणार असल्याचे देखील घाडगे यांनी सांगितले. पालकांनी लायसन्स नसेल अल्पवयीन पाल्यास वाहन देव नये, असे देखील आवाहन केले. यावेळी सहाय्यक फोजदार अनिल धनावडे, दशरथ कदम पोलीस नाईक विजय माळी यांनी कारवाईत सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)