दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी पालिकेकडून सल्लागारांची नियुक्ती

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दिव्यांग कल्याणकारी योजना सक्षमपणे राबविण्यासाठी आता सल्लागाराची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी पालिकेने समीर घोष यांची नियुक्ती केली आहे. या निवडीमुळे विविध कल्याणकारी योजनांचा लाभ शहरातील नागरिकांना मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे.

दिव्यांग व्यक्‍ती, तृतीयपंथी व्यक्ती, गरीबांचे कल्याण आणि पुनर्वसन या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पालिकेच्या योजना सक्षमपणे राबवण्याची गरज आहे. या योजनांचा लाभ प्रत्यक्ष घटकांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याचा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

हा आराखडा तयार करण्यासाठी तज्ज्ञ सल्लागार म्हणून पालिकेने पुण्यातील समीर घोष यांची निवड केली आहे. ही नियुक्‍ती 1 वर्षाकरता असून, त्यासाठी 19 लाख 32 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)