परिषदेला अकरा देशांच्या शास्त्रज्ञांची उपस्थिती

पिंपरी – सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठ संशोधन विभाग व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्‍त विद्यमाने दोन दिवसीय “न्यू फ्रंटियर्स इन एन्व्हायरमेंटल ऍन्ड अलाईड सायन्स’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या परिषदेत बग्लेरियातील कातीया वतोवा, त्सुं हा पार्क-दक्षिण कोरीया, डॉ. दिनेश अंमळनेरकर यांच्यासह लंडन, जपान, स्लोविनिया, इंग्लड, सौदी अरेबिया अशा 11 देशातील शास्त्रज्ञ उपस्थित होते. या प्रसंगी बग्लेरिया व दक्षिण कोरिया यांच्यासोबत तीन सामंजस्य करार करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी राजेंद्र घाडगे, संदीप कदम, ऍड. मोहन देशमुख, जाधव आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमळकर म्हणाले, पर्यावरण प्रश्‍नाचा सखोल वेध घेतला पाहिजे. वातावरणातील विविध स्तरांचा समतोल बिघडल्याने पर्यावरण विषयक प्रश्‍न निर्माण होवू लागले आहे. जल, वायू, हवा प्रदूषणास आपण जबाबदार आहोत. तसेच, पाण्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस बिकट होत चालला असून जमिनीतील पाण्याची पातळी खालावत आहे. पाण्यासाठी आपण भूगर्भात खोल विहिरी काढत असल्याने जमिनीतल्या पाण्यातही प्रदूषण होत आहे.

दक्षिण कोरियाच्या सुन किंग क्वाग विद्यापाठाचे ते-त्सुंग किम यांनी संशोधन आणि विकास यामधील अभ्यास करण्याची गरज आहे. तसेच, इतर विद्यापीठे व पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यांच्यात शैक्षणिक करार होण्याची आवश्‍यकता आहे. पर्यावरण संरक्षण आणि संशोधन आता नवीन वळण घेत आहेत. किंग सोदी विद्यापीठाचे अब्दुल्ला अल दफारी म्हणाले, शास्त्रज्ञांनी एकत्र येवून उपयुक्त प्रकल्प हाती घेण्याची आवश्‍यकता आहे. तसेच, एक्‍सजेंच प्रोग्राम अंतर्गत दोन देशातील विद्यार्थी,शास्त्रज्ञ अधिक चांगल्या पध्दतीने काम करु शकतील.

परिषदेची माहिती प्राचार्य डॉ. मनोहर चासकर यांनी सांगून सर्वांनी एकत्र येवून पर्यावरण संरक्षणासाठी संशोधन करण्याची आवश्‍यकता असल्याचेही, त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमांचे संयोजन परिषदेचे समन्वयक प्रा. डॉ. ए.के. शेख, उपप्राचार्य डॉ. खंडागळे, डॉ. दांगट, डॉ. शितोळे यांनी केले. डॉ. शिल्पागौरी गणपुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रुपल वाघमारे यांनी
आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)