पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची मासिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.20) आयोजित केली होती. मृत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करुन सभा 20 मे पर्यंत एक महिन्यासाठी तहकूब करण्यात आली. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.
सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी प्रचारात गुंतलेले आहेत. याशिवाय बहुतांशी कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर आहेत. महापालिकेची नियोजित मासिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.20) आयोजित करण्यात आली होती. या सभेला सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्यासह काही नगरसेवक उपस्थित होते. आचारसंहिता असल्याने महासभेमध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही. त्यामुळे या सर्व पदाधिकाऱ्यांनी केवळ सभेला उपस्थिती लावली.