पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर बीसीसीआयचा मोठा विजय, आयसीसीने पीसीबीची याचिका फेटाळली

नवी दिल्ली – भारतीय संघ पाकिस्तानशी क्रिकेट मालिका खेळण्यास तयार नसल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे बीसीसीआय विरोधात पीसीबीने याचिका दाखल केली होती.  ही याचिका आयसीसी डिस्प्यूट पॅनलने फेटाळून लावली आहे.

बीसीसीआय आणि पीसीबी यांच्यात सुरु असलेल्या वादावर आज अखेर पडदा पडला. आयसीसीच्या विशेष समितीने तीन दिवसाची सुनावणी घेत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची याचिका फेटाळत चांगलाच दणका दिला आहे.

संबंधित प्रकरणी सुनावणी ही 1 ते 3 आॅक्टोबरदरम्यान पार पडली. आयसीसीने स्वत आपल्या ट्विटरवरील खात्यावरून हि माहिती दिली आहे.

पाकिस्तान बोर्डाने याचिका दाखल करत बीसीसीआयकडून 70 मिलियन डाॅलर म्हणजे जवळजवळ साडेपाचशे कोटी रूपयांचे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती.  अखेर बीसीसीआय विरोधात आयसीसीच्या च्या डिस्प्यूट पॅनल कडे धाव घेतलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाची याचिका आज या पॅनेलने फेटाळून लावल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चांगलाच दणका मिळाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
501 :thumbsup:
0 :heart:
8 :joy:
0 :heart_eyes:
2 :blush:
7 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)