पायल सूर्यवंशीची धनुर्विद्या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड

सातारा – डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित साताराच्या न्यू इंग्लिश स्कूल ची विद्यार्थिंनी कुमारी पायल सागर सूर्यवंशी हीची धनुर्विद्या स्पर्धेसाठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. शालेय राज्यस्तरीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धा उस्मानाबादच्या श्रीतुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे झाल्या.

14 वर्षाखालील वयोगटात कु.पायल सागर सूर्यवंशी इयत्ता आठवी कंपाऊंड राउंड मध्ये सर्वाधिक गुण मिळवून सुवर्णपदकाची मानकरी ठरली. आंध्रप्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक प्रवीण सावंत व क्रीडा शिक्षक सुधाकर गुरव यांनी मार्गदर्शन केले. या सोबत शाळेतीलच 14 वर्षा खालील मुलांच्या गटातील ग्रुप मध्ये कोल्हापूर गटातून पृथ्वीराज सम्राट साळुंखे हा देखील सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याला प्रशिक्षक -शिवशंकर चोरट व क्रीडा शिक्षक सुधाकर गुरव यांनी मार्गदर्शन केले. शाला समितीचे अध्यक्ष डॉ संजीव गोखले, सदस्य अमित कुलकर्णी, सारंग कोल्हापूरे, मुख्याध्यापिका सा.ै स्नेहल कुलकर्णी, उपमुख्याध्यापक दिलीप कांबळ सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. यांच्या सत्कार प्रसंगी शाल प्रमुख सौ.स्नेहल कुलकर्णी पर्यवेक्षक श्रीरावडे सौ.दळवी, सौ. तिरमारे व क्रीडा शिक्षक सुधाकर गुरव.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)