पवार कुटुंबातील पहिला पराभव

मावळमध्ये राष्ट्रवादीला “जोर का झटका’
पिंपरी –
मावळ लोकसभा मतदारसंघातून यंदा पवार कुटुंबातील सदस्य असलेले पार्थ पवार यांना पराभव पत्करावा लागला आहे. मावळमध्ये त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला “जोर का झटका’ बसला आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राजकारणात असलेल्या पवार कुटुंबातील सदस्यांनी आत्तापर्यंत पराभव पाहिलेला नाही.शरद पवार यांचा गेल्या 50 वर्षांहून अधिक काळ राजकीय प्रवास सुरू आहे. मात्र, आजपर्यंत त्यांच्या कुटुंबातील कोणालाही पराभवाची चव चाखावी लागली नव्हती.

पवार कुटुंबियांमध्ये शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांच्या राजकीय जीवनात आत्तापर्यंत पराभव पाहिलेला नाही. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यासाठी माढ्यातून माघार घेतली. शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मावळ मतदारसंघात सभा घेऊन अवघे वातावरण ढवळून काढले होते. पवार कुटुंबियांनी ही लढत बरीच प्रतिष्ठेची केली होती. जनमताचा कौल शिवसेना-भाजप युतीचे श्रीरंग बारणे यांना मिळाल्याने पार्थ यांना दोन लाख 15 हजाराच्या मताधिक्‍याने पराभवाला सामोरे जावे लागले. तर, बारणे यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा खासदारकीची माळ पडली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)