पवारांना दिल्लीत रहायला घर शोधावं लागेल -चंद्रकांत पाटील

पंढरपूर: शरद पवार हे चार खासदारांच्या जीवावर दिल्लीत सौदेबाजी करतात. पण याच चार जागा निवडणुकीत पडल्यावर पवारांना दिल्लीत रहायला घर शोधावे लागेल, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. सांगोला येथे माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या प्रचाराचा भव्य मेळावा घेण्यात आला होता. यासाठी चंद्रकांत पाटीलांसह सहकार मंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रणजितसिंह मोहिते पाटील आणि आमदार प्रशांत परिचारक उपस्थित होते.

शरद पवार यांचा जीव बारामती, माढा, कोल्हापूर आणि सातारा या चार मतदारसंघामध्ये आहे. यंदा हे चारही मतदारसंघ भाजप जिंकेल. यामुळे शरद पवारांना दिल्ली राहण्यासाठी घर शोधावे लागेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. यावेळी भाजपचे उमेदवार रणजीत निंबाळकर यांनी नागरिकांना जिंकून देण्याचे आवाहन केले. आपण सर्व दुष्काळी भागातील पाण्यासाठी लढणारी लोके असल्याचे रणजीत निंबाळकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)