पवार, थोरातांचे डॉ. विखे यांच्याकडून आभार

“त्यांच्या’मुळे भाजपमध्ये; हा विजय आजोबांना समर्पित
नगर – संघर्षाच्या राजकारणामध्ये लोकशाहीचा विजय झाला आहे. हा विजय माझा नसून सर्व सामान्य जनतेचा, शेतकरी बंधूचा विजय आहे. तसेच ज्यांनी माझी उमेदवारी डावलली. मला विरोध केला, त्यांनी मला खाली आणण्याचा प्रयत्न केला, त्यांचे ही मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांनी जर तसे केले त्यामुळे मी आज भाजपमध्ये आहे. त्यांनीच मला योग्य पक्षामध्ये जाण्याचे संदेश दिले असल्याचा उपरोधक टोला भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुजय विखे यांनी शरद पवार व बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता माध्यमांशी बोलतांना लगावला.

लोकसभा निवडणुकीचा कल समोर आल्यानंतर विखे पत्रकारांशी बोलत होते. सकाळी सव्वा आठ वाजता विखे मतमोजणीच्या ठिकाणी आले. ते प्रत्येक फेरीनिहाय मतमोजणीचे आकडे घेत होते. माझे आजोबा खासदार होते. त्यांच्या प्रेरणामुळे मी खासदार होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा विजय मी माझे आजोबा बाळासाहेब विखे यांना समर्पित करतो. मला पडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. काहीजण मतभेद विसरून माझ्या विरोधात एक झाले. पण नगर जिल्ह्यातील जनतेने द्वेषाच्या राजकारणाला उत्तर दिले.

नगरमध्ये विखे-पाटील ही काय ताकद आहे, हे आम्ही दाखवून दिलं. “प्रवरा पॅटर्न’ चा पुन्हा उदय झालाय. देशात सगळीकडं भाजपचं वातावरण आहे, तसं ते नगर जिल्ह्यातही आहे. परंतु सर्वाधिक मताधिक्‍यातून इथं विखेंची ताकद दिसली आहे,’ असेहीं सुजय विखे म्हणाले. आज राज्यात तिसऱ्या क्रमांकाचे मताधिक्‍य मला मिळाले आहे, असे ते म्हणाले. हा विजय सुजय विखे यांचा नसून जिल्ह्यातील युवक, माता-भगिनी व युतीच्या कार्यकर्त्यांचा आहे.

निवडणूक काळात दिलेली सर्व आश्‍वासनं शंभर टक्के पूर्ण करणार. विकासाचा शब्द पूर्ण करणार,’ अशी ग्वाही सुजय यांनी असून एक फार मोठा विश्‍वास या संघर्षाच्या राजकारणात जनतेने माझ्यावर टाकला आहे. त्यांचे ही मनापासून अभिनंदन करतो. तसेच विखे पाटलाच्या नातवाचा हाट्ट हे नगरची जनतेने पुरवला आहे. त्यामुळे मला कुठल्या आजोबाची गरज नाही, माझ हट्ट नगर जिल्हा पुरवू शकतो. तसेच मी जे काही भाषणात बोललो होतो. ते महाराष्ट्रामधल्या तीन मतधिक्‍यामध्ये मी आहे. हा विजय भाजप, शिवसेनासह सर्व मित्रपक्षांचा आहे. शरद पवार यांनी 1991 सालची पुनरावृत्ती करु पण त्यावेळी झालेल्या आजोबांच्या पराभवाची 2019 मध्ये आम्ही परतफेड केली. 27 मे ला आचारसंहीता संपणार असून दुष्काळाच्या प्रश्‍नांना प्राधान्य देऊन शेतकऱ्यांचे सोडविल्या जातील.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)