पवारांनी साताऱ्याची द ग्रेट सर्कस केली; पंजाबराव पाटलांची घणाघाती टिका

सातारा –राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राष्ट्रवादीत सगळे राजे-महाराजे, सरदारांना घेवून साताऱ्याची द ग्रेट सर्कस केली आहे. अन त्या सर्कसीचे पवार रिंगमास्टर झाले आहेत, अशी घणाघाती टिका बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी केली आहे. जिल्हयात आमदार, खासदार कोणाला करायचे तसेच शरयू व जरंडेश्वर कारखान्याच्या माध्यमातून ऊसाच्या दरावर नियंत्रण ठेवण्याचे काम पवारांनी केले आहे, असे पाटील यांनी सांगितले.

सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवणार आहोत आणि संघटनेचा खासदार म्हणून निवडून आल्यास दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्व टोलनाके बंद करण्यात येतील, असेही पाटील यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)