नातवांमुळे पवार आजोबांची पंचाईत – दिवाकर रावते

कोल्हापूर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एका नातवासाठी माढ्यातून माघार घेतली. परंतु आता दुसरा नातू उठून बसला असुन आजोबा माझे काय? असे म्हणत आहे. या नातवांमुळे पवार आजोबांची चांगलीच पंचाईत झाल्याचा टोला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी लगावला.

शाहू मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण हॉल येथे शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. रावते म्हणाले, राजकारणातील दोस्तीच्या इतके आहारी आपण गेलेलो असतो की ती सोडवत नाही. आई वडीलांनी हाक मारली तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण या दोस्तीत गुंतलेलो असतो. परंतु या दोस्तीमुळे राजकीय अडचणी निर्माण होतात. हे पक्षासाठी हानिकारक आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी जनतेचा विश्वास संपादन करावा यश आपोआप तुमच्या मागे येईल, असे आवाहन रावते यांनी येथे केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)