पॅट्रिक शॅनहान अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवे संरक्षण मंत्री म्हणून पॅट्रिक शॅनहान यांच्या नावाची घोषणा अध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. मावळते संरक्षण मंत्री जिम मॅटीस यांचे ते निकटचे सहकारी आहेत आणि सध्या ते त्यांचे उप सहकारी म्हणून काम करीत आहेत. मॅटीस यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर गेल्याच आठवड्यात आपला राजीनामा घोषित केला होता.

त्यांनी अध्यक्षांना नवीन नियुक्तीला वेळ मिळावा म्हणून आपण फेब्रवारी अखेर पर्यंत कार्यरत राहु असे घोषित केले होते. पण ट्रम्प यांनी तडकाफडकी नवीन संरक्षण मंत्र्यांची नियुक्ती घोषित करून मॅटीस यांच्या राजीनाम्याच्या निर्णयाला फार महत्व देत नसल्याचे सूचित केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पॅट्रिक हे हंगामी संरक्षण मंत्री म्हणून 1 जानेवारीपासूनच आपल्या पदाची सूत्रे स्वीकारतील असेही ट्रम्प यांनी घोषित केले आहे. पॅट्रिक शॅनहान हे सन 2017 मध्ये पेंटॅगॉन मध्ये रूजु झाले पण त्यापुर्वी तीन दशके त्यांनी बोईंग विमान कंपनीत काम केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)