प्रो कबड्डी लीग स्पर्धा : पाटण्यची बंगालवर मात

मुंबई – चढाईत दीपक नरवालचे 13 तर प्रदीप नरवालचे 11 गुण अशा दमदार खेळाच्या जोरावर पाटणा पायरेट्सने शनिवारी प्रो कबड्डी लीग लढतीत बंगाल वाॅरियर्सवर 50-30 अशी मात केली. चढाया आणि बचाव अशा दोन्ही बाबींमध्ये सरस कामगिरी ही पाटणा पायरेट्सची जमेची बाजू राहिली.

पकडीत पाटणा संघातील खेळाडू जयदीपने 5 आणि विकास काळेने 3 गुणांची कमाई केली. तसेच बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या विजयने पाच चढायांत 4 गुण पटकावले.

पाटणा संघाचा हा पाचवा विजय ठरला. पाटणा संघ हा 28 गुणांसह  ब गटामध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे बंगाल वाॅरियर्सचा नऊ सामन्यातील हा तिसरा पराभव आहे. 27 गुणांसह बंगाल वाॅरियर्स चौथ्या स्थानावर पोहचली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)