पाटणला अतिवृष्टी

पाटण – तालुक्‍याच्या सर्व भागात गुरूवारी सकाळपासून जोरदार अतिवृष्टी सुरू आहे. कोयना नदीसह सर्वच नद्यांना पूर आला आहे. दुर्गम गावे या अतिवृष्टीमुळे चांगलीच गारठली असून अनेक गावांचा वीजपुरवठा दिवसभर खंडित झाला होता.

दरम्यान कोयना, नवजा, महाबळेश्‍वर याठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणात प्रति सेकंद 43200 क्‍युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी 2090 फूट झाली असून पाणीसाठा 37.61 टीएमसी झाला आहे.

पाटण तालुक्‍याच्या ढेबेवाडी व कोयना, मोरगिरी परिसरातील दुर्गम भागातील गावांना चांदोली आणि कोयना अभयारण्याने वेढा दिला असून अभयारण्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जंगलातील ओढे-नदी-नाले यांना महापूर आला आहे. घाटमाथावरुन वाहणारी काफना नदीला मोठा पूर आला आहे. केरा, तारळी, वांग, उत्तरमांड आणि मोरणा-गुरेघर प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.

तालुक्‍यातील जनजीवन अतिवृष्टीमुळे चांगलेच गारठले असून संततधार पावसामुळे दुर्गम भागातील शाळांना दुपारीच सुट्टी देण्यात आली. वनकुसवडे, सडावाघापूर कोयना, निवी, कसणी या भागातील गावे दाट धुक्‍यांनी व्यापली आहेत. मोरणा भागातील गुरूवार बाजारपेठेत आलेली आटोली, पांढरेपाणी, बाहे, पाचगणी या दुर्गम गावातील लोकांना पावसाने चांगलेच झोडपले. अति पावसामुळे कराड-चिपळूण मार्गावरील वाहतूक काही काळ खंडीत झाली होती.

मागील वर्षी कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत होता. मात्र यावर्षी कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाने काही प्रमाणात उसंत दिली. तर पुन्हा चांगली सुरुवात केली आहे. दरम्यान, गेल्या सतरा तासात कोयना 108 मिलीमिटर, नवजा 130 मिलीमिटर, महाबळेश्‍वर 97 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. परखंदीत भीषण अपघातात तरुण ठार महेश मधुकर पवार (वय 22, रा. बोपर्डी) असे अपघातातील तरुणाचे नाव आहे. हा अपघातगुरुवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला.

अधिक माहिती अशी, महेश पवार हा पुणे येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून तो सुट्टी असल्याने बोपर्डे येथे आला होते. पुण्याला जाण्यासाठी तो गुरुवारी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारासच दुचाकीवरुन निघाला होता. बोपर्डीपासून चार-पाच किलोमीटर अंतरावर परखंदी फाट्यावर आला असता त्याची समोरुन आलेल्या ट्रकला धडक झाली. या भीषण अपघातात महेश गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी महेशला तात्काळ उपचारासाठी वाई येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु, महेश प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अधिक उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास महेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघाताची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास वाई पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)