सावता महाराजांच्या प्रतीमेचे पाथर्डीत पूजन

पाथर्डी : येथे संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतीमा पूजन करण्यात आले.

पाथर्डी – शहरात विविध संघटनांच्या वतीने संतश्रेष्ठ सावता महाराज यांची पुण्यतिथीनिमित्त शहरातील आंबेडकर चौकात समाज बांधव व विविध मान्यवरांच्या हस्ते सावता महाराज यांच्या प्रतीमेचे पूजन करण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, माजी उपाध्यक्ष बंडू बोरुडे, नगरसेवक रमेश गोरे, भाऊ तुपे, पांडुरंग सोनटक्‍के, किशोर परदेशी, बबन सबलस, आजिनाथ डोमकावळे, अतुल पानखडे, नगरसेवक महेश बोरूडे, संजय साखरे, अक्षय काळे, संतोष सोनटक्‍के, माणिक साखरे, दत्ता सोनटक्‍के, तुकाराम पानखडे, नाना शिंदे, नीलेश केरकळ, लक्ष्मण सोनटक्‍के, दिलीप पानखडे, नाना नागरे, सोनू डोमकावळे, संजय केरकळ, ऍड. प्रतीक खेडकर, श्रीधर सोनटक्‍के आदी उपस्थित होते. मनसेच्या वतीनेही सावता महाराजांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी मनसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, मनसे परिवहन सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, मनसे जिल्हा उपाध्यक्ष संदीप गर्जे, मनसे शहराध्यक्ष सुभाष घोरपडे, मनसे जनहित जिल्हाध्यक्ष प्रविण वाघमारे, शैलेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते. वामनभाऊनगर येथे याप्रसंग वृक्षारोपण करण्यात आले. कसबा विभागातील संत सावता माळी महाराज मंदिरापासून सायंकाळी प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद व सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)