डीपीडीसीच्या निधीवरून पाटणला खडाजंगी

मासिक सभेत सदस्यांचा गदारोळ

पाटण – जिल्हा नियोजन समितीमधून विजवितरण आणि दुरुस्तीसाठी पाटण तालुक्‍यासाठी 50 लाख निधी मिळाला असून हा निधी पाटणकर गटाच्या सदस्यांमुळेच मिळाला, असे उपसभापती राजाभाऊ शेलार म्हणताच आ. देसाई गटाचे सदस्य पंजाबराव देसाई आणि सुरेश पानस्कर यांनी आक्षेप घेत आ. शंभूराज देसाई यांच्यामुळेच पाटणला जिल्हा नियोजन समितीतून सर्वात जास्त निधी मिळाला असल्याचे सांगितले. यावरुन पंचायत समितीच्या सभेत गदारोळ उडाला.

सभापती उज्ज्वला जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पाटण पंचायत समितीची मासिक सभा पार पडली. मासिक सभेत प्रारंभी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आ. शंभूराज देसाई यांच्या चुलत आजी वस्त्सला देसाई, ज्येष्ठ नेते तात्यासाहेब दिवशीकर आणि विशाल मोरे यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
कोयनानगर येथे कोयना प्रकल्पग्रस्तांचे 14 दिवसापासून आंदोलन सुरु असून त्यांच्या मागण्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. अशा असंवेदशील शासनाचा निषेध करावा, अशी मागणी उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी सभेत केली. कराड-चिपळूण रस्त्यांची कामे अत्यंत संथगतीने सुरु आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात वहाने चालवणे अत्यंत अवघड होणार आहे. याबाबत येत्या सहा मार्चपर्यत संबंधित विभाग आणि एल अँन्ड टी कंपनी ने दखल घ्यावी.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अन्यथा पाटण पंचायत समितीसमोर रास्ता रोको करु, असा इशारा राजाभाऊ शेलार यांनी दिला. ट्रान्सफॉर्मर जळून गेला आहे, असे घाटेवाडी सरपंच यांनी सभेत येऊन सांगितले. न्यू इंग्लिश स्कूल कालगाव शाळेला आयएसओ मानांकन मिळाले. तसेच तालुक्‍यातील 40 अंगणवाड्या आयएसओ झाल्याची माहिती श्रीमती वावडे यांनी दिली. ताईगडेवाडी येथे शाळेत 134 विद्यार्थी आहेत. तर फक्त चार शिक्षक आहेत. तसेच काजारवाडी येथील अंगणवाडी शिक्षिका सतत दांडी मारत आहेत, अशी तक्रार सदस्या सीमा मोरे यांनी केली. पाटण तालुक्‍यात 27 गावे पाणी टंचाई म्हणून घोषित करण्यात आली आहेत. तळमावले येथे गटार बांधकाम निकृष्ट दर्जाचे सुरु आहे, यावरुन सदस्य सीमा मोरे यांनी या कामाचे फोटो गटविकास अधिकारी व सभापती यांना दाखवत चांगलाच गोंधळ घातला.

वनविभाग अधिकाऱ्यांचा कामचुकारणा

पंचायत समितीच्या मासिक सभेस बरेच अधिकारी गैरहजर होते. यावरुन उपसभापती शेलार यांनी खास करुन पाटण वनविभाग अधिकारी लोकांच्या प्रश्‍नांकडे कामचुकारपणा करत आहेत. चिटेघर, घाणव येथील भागात गव्या रेड्यांनी धुमाकूळ घातला असून प्रचंड त्रास होत आहे, व्याघ्र प्रकल्प याचा त्रास आहे, याबाबत दखल घेतली जात नाही. वनविभाग अधिकारी सभागृहात येत नाहीत. यापुढे त्यांना त्यांच्या दारात जाऊन जाब विचारला जाईल, असा इशारा उपसभापती शेलार यांनी दिला.

पाणी पुरवठा अभियंता धारेवर

आगामी काळात पाणीटंचाई भासणार आहे. तेव्हा आम्हाला निवडणूक कामातून वगळण्यात यावे. म्हणजे टंचाई कामाकडे लक्ष देता येईल, अशी मागणी उपअभियंता एम. डी. आरळेकर यांनी केली. त्यावर सदस्य पंजाबराव देसाई यांनी अगोदर तुम्ही काम चुकारपणा करु नका. पाणी पुरवठा करण्यात येणारी कामे तुम्ही वेळेत करत नाही. अगोदर कामात सुधारणा करा, मग निवडणुक कामात सुट मागा, असे पंजाबराव देसाई यांनी आरळेकर यांना सुनावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)