कामगार संपाचा बॅंक व्यवहारांवर अंशतः परिणाम

नवी दिल्ली: कामगार संघटनांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाचा बॅंकांच्या व्यवहारांवर अंशतः परिणाम झाला. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात पुकारलेल्या या दोन दिवसांच्या या संपाचे आवाहन 10 कामगार संघटनांनी केले आहे. “द ऑल इंडिया बॅंक एम्लॉईज असोसिएशन’ आणि “बॅंक एम्प्लोईज फेडरेशन ऑफ इंडिया’ या बॅंक कर्मचाऱ्यांच्या दोन संघटनांनी या संपाला पाठिंबा दर्शवला होता.

या दोन्ही बॅंक क्षेत्रातील प्रमुख संघटना असल्याने अनेक कर्मचारी संपात सहभागी झाले होते. त्यामुळे बॅंकांमधील रोखीचे व्यवहार आणि धनादेश वटवण्याच्या कामांवर परिणाम झाले होते. अनेक बॅंकांमध्ये अधिकारीच ही कामे करत असल्याचे आढळून आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मात्र बॅंक क्षेत्रातील अन्य 7 संघटना संपात सहभागी झालेल्या नव्हत्या. त्यामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया आणि खासगी बॅंकांमधील व्यवहारांवर या संपाचा काहीही परिणाम झाला नाही.

यापूर्वी 26 डिसेंबरला विजया आणि देना बॅंकेचे बॅंक ऑफ बडोदामधील विलीनीकरणाच्या विरोधात बॅंक कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यापूर्वी 21 डिसेंबरला बॅंक अधिकाऱ्यांच्या संघटनेनेही संप पुकारला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)