‘पार्थ’ च्या मुलींनी पाठविल्या सैनिकांना पाचशे राख्या

पाथर्डी – रक्षाबंधनाच्या सणानिमित्त पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे विवेकानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी देशाच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या सैनिकांना आपल्या खाऊच्या पैशातून सुमारे पाचशे राख्या पाठवल्या. रक्षाबंधन हा भाऊ व बहिण यांच्या प्रेमाचे प्रतिक असणारा भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारा पवित्र असा सण आहे.

देशाचे रक्षण करणाऱ्या या बांधवांना राख्याबरोबर विविध संदेशही पाठविण्यात आले. अनेक विद्यार्थिनींनी स्वतः कलाकुसर करून या राख्या तयार केल्या. कार्यशिक्षण या विषयांतर्गत राख्या तयार करून या राखीच्या धाग्याने हजारो सैनिकांना आमच्या रक्षणासाठी सीमेवर लढताना प्रेरणा मिळणार असल्याच्या भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.

सैनिकांचे मनोधैर्य, त्यांचे शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, देशाभिमान, त्याग ही मूल्ये विद्यार्थ्यामध्ये जोपासली जावी, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिकतेची जोड मिळावी व समाजाच्या या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना व्हावा तसेच सैनिकांना सण-उत्सव साजरे करता यावेत, म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे विद्यालयाचे समन्वयक ज्ञानेश्वर गायके म्हणाले .

हा उपक्रम राबविण्यासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापक शारदा बारवकर, रेश्‍मा सातपुते, अर्चना दराडे, संदीप धायतडक, अशोक चौरे, सोनिका वखरे यांनी मार्गदर्शन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)