#व्यक्तिमत्व : लोक काय म्हणतील (भाग 2)

-सागर ननावरे

#व्यक्तिमत्व : लोक काय म्हणतील (भाग 1)

एका मध्यमवर्गीय घरातील मुलीचे लग्न ठरले होते. मुलगी लाडाची त्यामुळे लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. खर्चाचा काही प्रश्‍नच नव्हता. तयारीसाठी सर्व पाहुणेमंडळी आठवडाभर आधीच घरी आली होती. पाहुणचाराचा आनंद घेत होते. लग्नाच्या आधी काही दिवस लग्नाच्या मंडपातील नियोजनासाठी सर्वांची चर्चा करण्यात आली होती महत्त्वाचा विषय होता “भोजनाचा मेन्यू काय ठेवायचा?’

-Ads-

आपले वागणे, बोलणे, पेहराव, कृती यात आपण स्वतःच्या मनाला पद्धतशीरपणे बाजूला सारून लोकांच्या मनांना प्राधान्य देत असतो.

आता ही मानसिकता आपल्याला बदलायला हवी. आपण आपल्या मनाचे ऐकायला हवे. आपले भले कशात आहे हे आपल्याला चांगले कळायला हवे. आपले सामर्थ्य आणि आपल्या कमकुवत बाजू यांची लोकांनी सांगण्यापेक्षा आपल्याला जाण असायला हवी.

सुयोग्य निर्णयक्षमता आपली आपल्याला विकसित करता आली पाहिजे. सदगुरू वामनराव पै यांनी अतिशय सुंदर संदेश दिला आहे आणि तो म्हणजे, “तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार”. आपल्या जीवनाचे एक सुंदर शिल्प व्हावे की भला मोठा दगड हे आपल्यालाच ठरवायचे आहे. इतरांच्या सल्ल्यातून खरेच आपले भले होणार आहे का? याची सद्‌सदविवेकबुद्धी आपल्याकडे असायला हवी. अन्यथा केवळ लोक काय म्हणतील या विचारातच आयुष्य सरून जाईल.

आयुष्यात आपल्याला खूप मोठे यश मिळावे ही आपल्या प्रत्येकाची इच्छा असते. मोठमोठी स्वप्ने उराशी बाळगून आपण आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करीत असतो. परंतु या ध्येयप्राप्तीचा अनेकदा आपला मार्ग सोडून देतो. यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असतात; परंतु यासाठी खऱ्या अर्थाने सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे “लोक काय म्हणतील? हा विचार. हा एक विचारच नाही तर हे एक मोठे प्रश्‍नचिन्हच म्हणावे लागेल.

एक असे प्रश्‍नचिन्ह, ज्याचे उत्तर आपण सतत शोधत असतो. परंतु याचे उत्तर आपल्या विचारातच दडलेले आहे याबाबत मात्र आपण अनभिज्ञ असतो.

अभिनेते राजेश खन्ना यांच्या जुन्या चित्रपटात एक सुंदर असे गीत आहे. ज्या गीताच्या ओळी आपल्याला खूप काही सांगून जातील. चला त्या ओळींतून का होईना “लोक काय म्हणतील” या वृत्तीला फाटा देऊया.

कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना
छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत ना जाए रैना
कुछ तो लोग कहेंगे … 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)