पर्रिकरांनी राफेलची ती सिक्रेट्‌स जाहीर करावीत : सुर्जेवाला

नवीदिल्ली: गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी गोवा मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत त्यांच्या हटवल्या जाण्याच्या विषयावर संतप्त प्रतिक्रीया देताना म्हटले होते की भाजप आपल्याला मुख्यमंत्रीपदावरून हटवू शकत नाही कारण राफेलची अनेक सिक्रेट्‌स आपल्याला माहिती आहेत. याचा दाखला देत कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी म्हटले आहे की पर्रिकर यांनी ही गुपित स्वताकडे राखून न ठेवता ती त्वरीत खुली करावीत.

कॉंग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्‍त्याने आज दिल्लीत अधिकृत पत्रकार परिषद घेऊन पर्रिकर यांनी त्यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत असे विधान केल्याचा जो दावा केला आहे त्यावर गोवा सरकारकडून मात्र अजून कोणताही खुलासा आलेला नाही. दोन दिवसांपुर्वी पणजीत पर्रिकर यांच्या उपस्थितीत त्यांच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्यावेळी पर्रिकर यांनी आपल्याकडे राफेल कराराच्या फाईलची कॉपी आहे त्यामुळे ते आपल्या मुख्यमंत्रीपदावरून हटवू शकत नाहीत असे म्हटले होते.
त्यासंबंधात सुर्जेवाला यांनी भाजपला काही प्रश्‍न विचारले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पर्रिकर यांच्याकडे राफेलचे गुपित आहे म्हणूनच त्यांना ते आजारी असतानाही मुख्यमंत्रीपदावर कायम ठेवण्यात आले आहे काय हे भाजपने स्पष्ट केले पाहिजे. राफेलच्या या सिक्रेट्‌सचा उल्लेख पर्रिकरांनी डर्टी सिकेट्‌स असाही केला आहे. ही सिक्रेट्‌स नेमकी काय आहेत हे देशाला जाणून घ्यायचे आहे. मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालय आणि संसदेपासून राफेल प्रकरणात नेमके काय लपवून ठेवले आहे ते जाहींर होणे राष्ट्र हिताचे आहे असेही त्यांनी म्हटले आहे. पर्रिकरांनी त्यांच्याकडील ही डर्टी सिक्रेट्‌स जाहीर केली तर राफेल प्रकरणातले सारेच तथ्य बाहेर येईल त्यांनी ते लपवून ठेऊ नये अशी सुचनाही सुर्जेवाला यांनी त्यांना केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)