पर्रिकर म्हणाले मोदींच्या नव्या राफेल कराराशी आपला संबंध नाही : राहुल गांधी यांनी केला गौप्यस्फोट

कोची : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राफेल विमान खरेदीचा जो नवीन करार केला त्याच्याशी आपला काही एक संबंध नव्हता असे तत्कालिन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपल्याशी झालेल्या चर्चेच्यावेळी सांगितले आहे असा गौप्यस्फोट कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. ते म्हणाले की आपले उद्योगपती मित्र अनिल अंबानी यांनाच लाभ पोहोचवण्यासाठीच मोदींनी तत्कालिन संरक्षण मंत्र्यांना बाजूला ठेऊन स्वत:च हा राफेल करार केला आहे. त्यासाठी त्यांनी देशातील संरक्षण सामग्री खरेदीची सारी प्रक्रियाच बाजुला ठेवली होती असे पर्रिकर यांच्या विधानांवरून स्पष्ट होत आहे असा दावाही त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी कालच पर्रिकर यांची गोवा विधीमंडळाच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली होती. त्यांच्याशी त्यांनी त्यावेळी दहा मिनीटे चर्चा केली होती. पण या चर्चेनंतर त्यांनी नेमकी काय चर्चा झाली याविषयी वाच्यता करणे टाळले होते आज येथे एका जाहींर सभेत बोलताना त्यांनी ही माहिती लोकांना देऊन राफेल प्रकरणाला पुन्हा हवा देण्याचा प्रयत्न केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गोव्यातील एक मंत्री विश्‍वजीत राणे यांनी टेलिफोन वर आपल्या एका मित्राशी बोलताना राफेलशी संबंधीत महत्वाच्या फायली पर्रिकरांच्या बेडरूम मध्ये असल्याचे स्वत: पर्रिकर यांनीच मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत सांगितले आहे असे म्हटले होते. या फोन संभाषणाची ऑडिओ क्‍लीप राहुल यांनी लोकसभेत वाजवण्याची अनुमती सभापतींकडे मागितली होती पण त्यांना त्यावेळी ती अनुमती मिळाली नव्हती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)