राहुल यांच्याशी झालेल्या चर्चेत राफेलचा विषय निघाला नाही : पर्रिकर

सदिच्छा भेटीचा केला राजकारणासाठी उपयोग

नवी दिल्ली : कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आपली पाच मिनीटांसाठी सदिच्छा भेट घेतली होती या भेटीचाही त्यांनी राजकारणासाठी वापर केला आहे अशी खंत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी व्यक्त केली आहे. आपल्या पाच मिनीटांच्या या भेटीत राफेलचा विषय निघाला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राहुल गांधी यांना पत्र लिहुन त्यांनी ही खंत व्यक्त केली आहे. त्यांनी सत्य कथन करावे अणि आजारी माणसाला दिलेल्या भेटीचे असे राजकारण करू नये असे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधी यांनी कोची येथील जाहींर सभेत मनोहर पर्रिकर यांच्याशी झालेल्या भेटीचा उल्लेख करून पर्रिकर यांनी मोदींच्या नव्या राफेल कराराशी आपला संबंध नसल्याचे म्हटले होते असा दावा केला आहे. त्या संबंधात पर्रिकरांनी त्यांना पत्र लिहुन ही बाब स्पष्ट केली आहे. तुम्ही या भेटीचा राजकीय कारणासाठी उपयोग केला हे योग्य नव्हते. तुम्ही माझ्या समवेत पाच मिनीटेच होता त्यात मी किंवा तुम्ही राफेलचा विषयच उपस्थित केला नव्हता किंवा त्या संबंधीत कोणत्याहीं विषयाशी आपण चर्चा केलेली नाही असेही पर्रिकर यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)