पारनेर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्षपदी कळमकर

पक्षाच्या नियमानुसार निवडी करणार – राजेंद्र फाळके

सुपे – पारनेर तालुक्‍यातील पाडळी रांजणगावचे उपसरपंच विक्रमसिंह कळमकर यांची तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या हस्ते कळमकर यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी मावळते तालुका युवक अध्यक्ष अशोक घुले यांची जिल्हा युवक सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, तालुक्‍याचे नेते मधुकर उचाळे, बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, पंचायत समितीचे उपसभापती दिपक पवार, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, शंकर नगरे आदी उपस्थित होते. तालुक्‍यात चार दिवसापूर्वी सुजीत झावरे यांनी विद्यमान तालुका अध्यक्ष अशोक घुले यांच्या जागी बबलू रोहकले यांची निवड केली होती, त्यावर घुले यांनी सांगितले की, माझ्या लेटर हेडचा गैरवापर केला गेला आहे. मी युवक तालुका अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नाही असे, सांगत जिल्हाध्यक्ष यांच्याकडे झालेला प्रकार कथन केला.

या प्रकाराची दखल घेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दखल घेऊन सर्व प्रकार प्रभारी दिलीप वळसे पाटील व अजित पवार यांच्या कानावर घातला. पवार यांनी पक्षाच्या नियमानुसार नवीन युवक अध्यक्षाची निवड करण्याचे आदेश फाळके यांना दिला होता. त्यानुसार ही निवड करण्यात आली असुन, पुढेही इतर पदाधिकारी यांच्या निवडी पक्ष नियमानुसार होतील, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व दादाभाऊ कळमकर यांनी यावेळी स्पष्ट केले. विक्रमसिंह कळमकर यांची पारनेर युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)