येत्या 31 जानेवारीपासून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

नवी दिल्ली: संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या काळात होंण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. हे निवडणुकांचे वर्ष असल्याने आणि केवळ चार महिन्यांवरच निवडणूक आली असल्याने केंद्र सरकारकडून यंदा पुर्ण अर्थसंकल्प न मांडता केवळ अंतरीम अर्थसंकल्प मांडला जाणार आहे आणि तो प्रथेनुसार 1 फेब्रुवारी रोजी मांडला जाईल.

लोकसभेचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल. येत्या एप्रिल ते मे महिन्यात लोकसभा निवडणुकांची प्रक्रिया देशात सुरू होईल. त्यामुळे या शेवटच्या अधिवेशनाला आणि अंतरीम अर्थसंकल्पाला महत्व आहे. या अंतरीम अर्थसंकल्पात निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काही महत्वाच्या योजना विशेषत: शेतकऱ्यांसाठीच्या सवलती जाहीर होण्याची शक्‍यताहीं वर्तवली जात आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)