श्रीलंकेच्या संसदेत संसदीय कामकाज समिती निवडण्यास सहमती

कोलंबो – श्रीलंकेच्या संसदेमध्ये सुरू असलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्‍वभुमीवर संसदीय कामकाज समिती निवडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहमती दर्शवली आहे. राजपक्षे यांचे संसदेतील बहुमत अजमावण्यासाठी आज तिसऱ्यांदा संसदेला पाचारण करण्यात आले होते. मात्र केवळ दहाच मिनिटांमध्ये कामकाज तहकूब करावे लागले. संसदीय कामकाजाच्या समितीमध्ये कोण सदस्य असावेत, याचा निर्णय आज होऊ शकला नाही. आज संसदेचे कामकाज सुरू होताच उपसभापती आनंदा कुमारसिरी यांनी संसदीय कामकाज समितीमधील सदस्यांच्या निवडीसाठी एक निवड समिती निश्‍चित केली असल्याचे जाहीर केले.

विक्रमसिंघे यांच्या “युनायटेड नॅशनल फ्रंट’, “तामिळ नॅशनल अलायन्स’ आणि “जेव्हीपी’ किंवा “पीपल्स लिबरेशन फ्रंट’ यांच्या नेत्यांमध्ये या प्रस्तावाबाबत चर्चा झाली. सिरीसेना यांनी सुचवलेल्या या प्रस्तावानुसार राजपक्षे यांच्यसाठीचे तिसरे मतदान हे  इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने घेण्याचे ठरले आहे. हा प्रस्ताव मागे घेण्यास सिरीसेना आणि राजपक्षे यांच्या युनायटेड फ्रीडम अलायन्सने सपशेल नकार दिला होता. आजचे दिवसभराचे कामकाज शांततेत पार पडले आणि 10 मिनिटांनी संसदेचे कामकाज 23 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)