ट्‌विटरच्या सीईओना संसदीय समितीचे समन्स

नवी दिल्ली : “ट्विटर’च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना संसदेच्या माहिती तंत्रज्ञान विषयक समितीपुढे हजर होण्याचे समन्स बजावण्यात आले आहे. येत्या 25 फेब्रुवारीला संसदीय समितीपुढे हजर होण्याचे समन्स बजावण्यात आल्याचे या समितीचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार अनुराग ठाकूर यांनी संगितले. भारतात ट्विटरच्या प्रतिनिधी संसदीय समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी संसदेमध्ये पोहोचले होते. मात्र त्यांना बैठकीमध्ये बोलावले गेले नाही.

संसदीय समितीची बैठक 7 फेब्रुवारीला निश्‍चित झाली होती. मात्र नंतर ही बैठक 11 फेब्रुवारी (आज)पर्यंत पुढे ढकलण्यात आली. ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्से आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बैठकील उपस्थित राहणे शक्‍य व्हावे यासाठी ही बैठक पुढे ढकलण्यात आली, असे सूत्रांनी शनिवारी सांगितले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)