भारताची फुलराणी सायना नेहवालच्या बायॉपिकमध्ये श्रद्धा कपूर काम करणार होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी शुटिंगच्या तारखांमुळे श्रद्धाने या चित्रटातून माघार घेतली. आता या बायॉपिकमध्ये परिणीती चोप्रा काम करणार आहे. परिणीती नुकताच प्रदर्शित झालेल्या “केसरी’मध्ये झळकली होती.
आता परिणीती तिच्या पुढील प्रॉजेक्टच्या तयारीला लागली असून बॅडमिंटनपटू सायना नेहवालची भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी परिणीती सध्या हार्ड ट्रेनिंग घेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमोल गुप्ते करणार असून चित्रपटाची शूटिंग करण्यापूर्वी परिणीतीने कमीत कमी 3 ते 4 महिने ट्रेनिंग घ्यावी, असे त्यांचे मत आहे.
दरम्यान, अभिनेत्री परिणीतीने काही दिवसांपूर्वी एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. ज्यात ती बॅडमिंटनच्या कोर्टवर दिसते. या बायॉपिकशिवाय परिणीती “जबरिया जोडी’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत झळकणार आहे. तसेच अर्जुन कपूरसोबत “संदीप और पिंकी फरार’मध्येही काम करत आहे.