लोकसभा निवडणूक लढणार नाही : परेश रावल

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून देशभरामध्ये विविध राजकीय पक्षांकडून निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. अशातच आता ज्येष्ठ अभिनेते तथा भाजप नेते परेश रावल यांनी आपण यंदा लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची माहिती एका वृत्तसंस्थेला दिली आहे. ते म्हणतात,

‘मी मागील चार ते पाच महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक लढणार नाही असे पक्षाला सांगितले होते मात्र याबाबत अंतिम निर्णय पक्षच घेईल. आतापर्यंत पक्षाकडून याबाबत कुठलेही स्पष्टोक्ती देण्यात आली नाही. रावल यांचा स्पष्टोक्तीमुळे लोकसभा निवडणुकांच्या रिंगणातून माघार घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)