एपिया (समोआ) – भारताच्या परदीपसिंगने येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. त्याने या स्पर्धेतील 109 किलो विभागात हे यश संपादन केले.
त्याने स्नॅचमध्ये 149 किलो तर क्लीन व जर्क विभागात त्याने 202 किलो असे एकूण 350 किलो बजन उचलले. त्याचा सहकारी विकास ठाकूरने 96 किलो गटात रौप्यपदक मिळविले. त्याने स्नॅचमध्ये 153 किलो तर क्लीन व जर्क विभागात त्याने 185 किलो असे एकूण 338 किलो बजन उचलले.