परभणीत कर निरीक्षकाला घरी बोलावून मारहाण

राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळेंविरोधात गुन्हा दाखल

परभणी – आमदार नितेश राणे यांनी अधिकाऱ्याच्या अंगावर चिखल टाकून मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच परभणीत जिंतूरचे राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांनीही नगरपरिषदेच्या कर निरीक्षकाला घरी बोलावून मारहाण केली आहे.याप्रकरणी जिंतूरचे राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिंतूर नगर परिषदेचे कर निरीक्षक दत्तराव तळेकर यांना आज आमदार विजय भांबळे यांनी त्यांच्या घरी बोलावले होते. यावेळी त्यांच्या घरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, नगराध्यक्ष यांचे पती कपिल फारुकी यांच्यासह अनेक नगरसेवक, नगरपालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विजय भांबळे यांनी तुम्ही काम बरोबर का करत नाहीत, असे म्हणत वाद घातला. वाद वाढल्यानंतर भांबळे यांनी तळेकर यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली.

विशेष, म्हणजे हा प्रकार मुख्याधिकाऱ्यांसमोरच घडला. यानंतर कर निरीक्षक दत्तराव तळेकर यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर आमदार विजय भांबळे यांच्याविरुद्ध मारहाण करणे, शिवीगाळ करणे, शासकीय कामात अडथळा आणणे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)