पॅरा आशियाई स्पर्धेत भारताला आणखी तीन सुवर्ण

जकार्ता – बुद्धिबळातील दोन सुवर्णपदके आणि बॅडमिंटनमधील सुवर्णपदक याच्या जोरावर भारताने आशियाई पॅरा (दिव्यांग) क्रीडा स्पर्धेत आपली घोडदौड कायम राखली. पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारी दीपा मलिक हिने आपले दुसरे ब्रॉंझपदक पटकावून वाहवा मिळविली.

बुद्धिबळात महिलांमध्ये के. जेनिथा अँटोने जलद प्रकारात इंडोनेशियाच्या रोसलिंडाला 1-0 असे नमविले तर किशन गांगुलीने पुरुषांच्या जलद बुद्धिबळात सुवर्ण जिंकले. जेनिथा ही रॅपिड पी 1 या प्रकारात खेळत होती. हा प्रकार दिव्यांग खेळाडूंसाठी आहे तर किशन ज्या प्रकारात खेळत होता त्या रॅपिड 6 प्रकारात दृष्टीहीन खेळाडू खेळतात.

-Ads-

महिलांच्या बॅडमिंटनमध्ये पारुल परमारने थायलंडच्या कामतामवर 21-9, 21-5 अशी मात करत सुवर्णपदक जिंकले. बॅडमिंटनच्या एसएल 3 या प्रकारात पायात ताकद नसेल आणि संतुलन करणे किंवा चालणे सहज शक्‍य नसेल असे खेळाडू सहभागी होतात. त्यांना उभ्यानेच खेळावे लागते.

या सुवर्णपदकानंतर परमार म्हणाली की, मी गुजरातमध्ये भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या केंद्रात प्रशिक्षक आहे. पॅरालिम्पिक हे माझ्ये लक्ष्य आहे. मला आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी प्रायोजकांची गरज आहे. सरकारने यात लक्ष घालावे असे वाटते. जलतरणात स्वप्नील पाटीलने पुरुषांच्या 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य जिंकले. त्याने 400 मीटर फ्रीस्टाइलमध्ये ब्रॉंझ जिंकले होते. रिओ पॅरालिम्पिकमध्ये रौप्य जिंकणारी दीपा मलिक हिने महिलांच्या थाळीफेक प्रकारात दुसरे ब्रॉंझ जिंकले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)