‘बीड’मध्ये पंकजा मुंडेंचा विनायक मेटेंना ‘चेकमेट’ !

मुंबई : शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे हे आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या बीड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारास मदत करणार आहेत. पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. दरम्यान पंकजा मुंडेंनी आपल्या बहिणीसाठी नवी खेळी आखली आहे.

काय म्हणाले होते विनायक मेटे ? 

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या पाच वर्षांमध्ये येथील भाजप खासदाराने आमच्या कार्यकर्त्यांना हीन दर्जाची वागणूक दिली आहे. मला याबाबत माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपण हे सहन करावे का? असं विचारलं असता मी त्यांना आपण हे सहन करण्याचे काही एक कारण नसून तुम्हीच योग्य तो निर्णय घ्या असं सांगितलं.

विनायक मेटेंच्या एका निकटवर्तीयाने याबाबत खुलासा करताना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मेटे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना प्रीतम मुंडे यांच्याविरोधात मदत करणार असल्याचे सांगितले. मात्र मेटे इतर मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांनाच पाठिंबा देतील असं देखील त्यांनी स्पष्ट केले होते.

पंकजा मुंडेंची नवी खेळी ?

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार मेटे यांच्यापासून दुरावलेले युवक नेते राजेंद्र मस्के यांना भाजप प्रवेशाची दारं उघडी केली. संध्याकाळी अंबाजोगाईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत मस्के त्यांच्या मित्र मंडळाच्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केला. मस्के यांचा बीड विधानसभा मतदार संघात दांडगा संपर्क आहे. त्यामुळे भाजपला त्याचा नक्की फायदा होणार आहे. ही मेटेंसाठी एक चपराक समजल्या जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)