पाणी समस्येमुळे मुलांना मुली मिळत नाही- पंकजा मुंडे 

नगर : नगर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. रात्री-अपरात्री महिलांना पाणी भरण्यासाठी उठावे लागते. त्यामुळे नगरमधील मुलांना कुणी मुली देण्यास तयार नाही. एखादी मुलगी नगरमधून बाहेर लग्न होऊन चालली की सुटले या त्रासातून असे म्हणत आनंदाने जाते. शहरात शिस्त नसल्याने ही परिस्थिती असल्याची टीका ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली.

भाजपच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात मुंडे बोलत होत्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष खा. दिलीप गांधी, माजी उपमहापौर गीतांजली काळे, सुनील रामदासी, छाया राजपूत आदींसह भाजपचे उमेदवार व महिला कार्यकर्ते उपस्थित होते.

-Ads-

मुंडे म्हणाल्या, नगरमध्ये मिळत असलेला प्रतिसाद पाहता विजयाचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. महिलांना शहरात मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजेत. महिला, मुलींना सुरक्षा मिळाली पाहिजे. त्यामुळे भाजपची सत्ता येणे आवश्‍यक आहे. मोदींनी बेटी बचाव, बेटी पढाव’चा नारा दिला. देशातील सर्व महत्वाची खाते महिलांकडे दिली आहेत. शासनाने मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी प्रयत्न केले. महिला बचत गटांची योजना शहराच्या बचत गटांसाठीही लागू करणार आहोत. यातून शहरातील महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळेल. महिला सक्षम करण्याचं काम आम्ही करतोय. विकास ओटीत घेण्यासाठी महिलांनी आतापासूनच तयारी करावी.

खा. गांधी म्हणाले की, आपल्याला 9 तारखेला शहराचं चित्र बदलायचंय. महिलांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. गेली 15 वर्षे शिवसेना- भाजपची सत्ता महापालिकेवर होती. बाहेरून घरी कुणी पाहुणे आले तर आपल्याला बाजारपेठेतही त्यांना घेऊन जावे वाटत नाही. शहरात पर्यटनस्थळे असली तरी त्याठिकाणी सुविधा नसल्याने बाहेरच्यांना शहरात आल्यावर पर्यटनालाही नेता येत नाही. निवडणूक भावनात्मक करून लढविली. महापालिकेची इतकी दुरावस्था झाली की आता 125 कोटींचे कर्ज आहे. आमच्या हातात सत्ता दिल्यास एका वर्षात कर्जमुक्त करण्यात येईल. दिशाहीन नेतृत्वाच्या हाती सत्ता दिल्यानेच शहरात समस्या असल्याचे खा. गांधी म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)