धनंजय मुंडेंना रिंगणात उतरण्याचे पंकजा मुंडेंचे खुलं आव्हान 

बीड – लोकसभा  निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून  लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असताना राजकीय उलथापालथ देखील सुरू झाली आहे. अशातच सर्व पक्षीय नेते विरोधी पक्षातील नेत्यांबद्दल प्रचार दौऱ्यावेळी शाब्दिक टीका करत आहे.

दरम्यान,  भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांना जाहीर आव्हान दिले आहे. निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला फक्त एक दिवस बाकी आहे, तर धनंजय मुंडे तुम्ही स्वतः निवडणूक का लढवत नाही? असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला आहे. मी वडिलांचा गड बांधला असून, तुम्ही चौथरा तरी बांधला का? तुम्ही स्वतः निवडणुकीच्या मैदानात उतरा आणि जनता कोणाच्या मागे आहे हे बघा, असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडेंना रिंगणात उतरण्याचं खुलं आव्हान दिलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)