नगर_महापालिका_रणसंग्राम_2018 : पंकजा मुंडे यांची आज शहरात सभा

नगर – महापालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला असून,अखेरच्या आठवड्यात भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या सभा आणि प्रचारफेऱ्यांमुळे शहरातील वातावरण चांगलेच तापणार आहे. आज (रविवारी) ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या प्रचारात सहभागी होणार आहेत. त्यांच्या तीन प्रचारफेऱ्या व महिला मेळावा आणि विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

पंकजा मुंडे यांची रविवारी सकाळी 9:45 वा. कायनेटिक चौक ते विद्यानगर अशी पहिली प्रचार रॅली होणार आहे. त्यानंतर सकाळी 11:30 वा. दुसऱ्या प्रचार रॅलीला सुरूवात होणार असून ही रॅली शिवाजी महाराज पुतळा, माळीवाडा, आशा टॉकीज, नवीपेठ ते चितळेरोड या परिसरातून पार पडणार आहे. तर दुपारी 12:30 च्या सुमारास स्वास्तिक चौक येथील तुषार गार्डन येथे महिला मेळाव्याला त्या संबोधित करणार आहेत.

भाजपने महापालिका निवडणुकीत 35 महिलांना उमेदवारी दिली असून या सर्व महिला उमेदवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता तिसरी प्रचार रॅली आरटीओ ऑफिस येथून सुरू होणार असून या रॅलीचा मार्ग मिस्कीम मळा, प्रोफेसर कॉलनी, वैदूवाडी, भिस्तबाग, भगवान बाबाचौक ते एकवीरा चौक असा राहणार आहे. या रॅलीनंतर सायंकाळी 7:30 वा. सावेडी परिसरातील एकवीरा चौकात (सावेडीत) विजय संकल्पसभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेला खा. दिलीप गांधी तसेच भाजपचे सर्व प्रतिनिधी आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)