देशाच्या विकासात महापुरुषांचे योगदान मोठे – पंकजा मुंडे

पुणे – देशाच्या विकासात महापुरुषांचे मोठे योगदान आहे. त्यांनी कधीही जात-धर्म न पाहता फक्त देशसेवेसाठीच काम केले. हे महापुरुष देशांचे आधारस्तंभ आहेत. त्यांची जातीपातीत विभागणी करणे योग्य नाही, असे राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी केले.

राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाच्या वतीने दिले जाणारे 2017 -18 व 2018-19 या दोन वर्षांचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार आणि पद्‌श्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार शुक्रवारी प्रदान करणत आले. यावेळी त्या बोलत होत्या. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार माधुरी मिसाळ, प्रशांत बंब, ऍड. गौतम चाबुकस्वार, प्रधान सचिव दिनेश वाघमारे, समाजकल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे उपस्थित होते. यावेळी जम्मू-काश्‍मीरमदील पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुंडे यांनी निषेध केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागासवर्गीय समाजाच्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीमध्ये बदल झालेला नाही. सध्य स्थितीत समाजातील केवळ 9 टक्के समाजाकडे जमीन आहे. उर्वरित सर्व लोक आजही भूमिहीन व शेतमजूर आहेत. दरम्यान, महापुरुषांच्या स्मारकांसाठी राज्यातील 50 ठिकाणे निश्‍चित करण्यात आलेली आहेत. त्याठिकाणी लवकरच महात्मा फुले ज्योतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांची स्मारके उभारली जातील. अण्णा भाऊ साठे महामंडळाला जास्त निधी देण्याचा सकारामक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)