पंकज अडवाणीला 32वे राष्ट्रीय जेतेपद

नवी दिल्ली – भारताचा आघाडीचा स्नूकरपटू पंकज अडवाणीने युवा खेळाडू लक्ष्मण रावत याचा पराभव करताना रविवारी आणखी एका राष्ट्रीय विजेतेपदाची कमाई केली. राष्ट्रीय स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना त्याने 32व्यांदा राष्ट्रीय सुवर्णपदक मिळवले आहे.

अडवाणीच्या खात्यात आता 11 कनिष्ठ स्पर्धेची विजेतेपदे, नऊ वेळा बिलियर्डसचा राष्ट्रीय विजेता, तीन वेळा “सिक्‍स-रेड’ स्नूकर स्पर्धेचे विजेतेपद आणि नऊ वेळा स्नूकरचा विजेता अशी 32 राष्ट्रीय विजेतेपदे जमा झाली आहेत. त्याचबरोबर अडवाणीने 21 वेळा जागतिक स्पर्धेचे विजेतेपदे पटकावले आहे. यावेळी झालेल्या अंतिम फेरीवर पूर्णपणे अडवाणीचे वर्चस्व पाहायला मिळाले.

अडवाणीने रावतवर 6-0 अशी मात केली. तर, महिलांच्या अंतिम फेरीत, बेंगळुरूचा वर्षा संजीव हिने महाराष्ट्राचा अरांसा सांचीझ हिला 4-2 अशा फरकाने पराभूत करत राष्ट्रीय विजेतेपदाला गवसणी घातली. वर्षाने उपान्त्यपूर्व फेरीत अमी कमानी हिला तर उपान्त्यफेरीत विद्या पिल्ले हिचा पराभव करत या स्पर्धेवर वर्चस्व गाजवले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)