जागतिक बिलियर्ड्स स्पर्धा : पंकज अडवाणीचे 21 वे विजेतेपद

यँगाॅन – भारताचा आघाडीचा बिलियर्ड्सपटू पंकज अडवाणी याने रविवारी कारकिर्दीत विक्रमी चौथ्यांदा आयबीएसएफ जागतिक बिलियर्ड्स अंजिक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. बिलियर्ड्स आणि स्नूकरमध्ये मिळून त्याचे हे 21 वे जागतिक विजेतेपद ठरले.

पकंज अडवाणीने एका आठवड्यात हे दुसरे विश्वविजेतेपद पटकावले आहे. पंकज अडवानीने गुरूवारी ‘150 अप’ शॉर्ट फॉरमॅट मध्ये सलग तिसऱ्यांदा ‘आयबीएसएफ जागतिक बिलियर्ड्स’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर लाँग फॉरमॅट मध्येही पंकजने मारली बाजी मारली. पंकजने 1500 गुण मिळवत भारताच्याच बी भास्करचा पराभव केला. याच स्पर्धेत बी. भास्कर रौप्यपदकाचा मानकरी ठरला.

-Ads-

स्नूकर आणि बिलियर्ड्स या दोन्ही प्रकारात खेळून दोन्हीमध्ये विजेतेपद पटकावणारा पंकज हा एकमेव भारतीय खेळाडू ठरला आहे.

जागतिक बिलियर्ड्स स्पर्धा : पंकज अडवाणीने सलग तिसऱ्यांदा पटकावले विजेतेपद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)