सोलापूर – पंढरपूरची वारी हा एक अद्भूत सोहळा आहे. दिंड्या-पताकांबरोबर टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या जयघोषात लाखो वारकरी पंढरपुरात दाखल होत असतात. माउलींच्या पालखीनेही आज साताऱ्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला.
दरम्यान, माउलींच्या या पालखी सोहळ्यात काही दिव्यांग वारकरी देखील सहभागी झाले असून, अश्याच एका दिव्यांग वारकऱ्याशी केलेली ही खास बातचीत…