पालघर, भिवंडीत सर्वाधिक 35 फेऱ्या

मुंबई – लोकसभा निवडणुकांचे 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत. महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी पालघर आणि भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच 35 निवडणूक निकाल फेऱ्या होतील. पालघर आणि भिवंडी-गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात एकूण 33 निवडणूक निकाल फेऱ्या, तर बीड आणि शिरुर मतदारसंघात एकूण 32 निवडणूक निकाल फेऱ्या होतील. सर्वात कमी म्हणजे 17 निवडणूक निकाल फेऱ्या हातकणंगले मतदारसंघात होतील. अमरावती आणि सांगली मतदारसंघात 18 निवडणूक फेऱ्या होतील.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातून एकूण 867 उमेदवार उभे आहेत. या निवडणुकीमध्ये राज्यभरात 97 हजार 640 मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)