#PAKvNZ Odi Series : तिसरा सामना रद्द, मालिका बरोबरीत

दुबई : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्याच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे होऊ न शकल्याने रद्द करण्यात आला. या तीन एकदिवसीय मालिकेत पहिला सामना न्यूझीलंडने तर दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला होता. तिसरा सामना रद्द झाल्याने तीन एकदिवसीय सामन्याची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली आहे.

-Ads-

तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानने 50 षटकांत 8 बाद 279 धावसंख्या केली होती. त्यानंतर न्यूझीलंड संघाने फलंदाजीस सुरूवात केली असताना जोरदार पावसामुळे सामना थांबवावा लागला. पावसामुळे हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

तिसऱ्या सामन्यात 5 धावांत 5 बळी घेणाऱ्या  न्यूझीलंडच्या ल्यूक फर्ग्युसनला सामनावीर तर पाकचा गोलंदाज शाहिन आफ्रिदीला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)