अबब! या ‘पकोडे’ विकणाऱ्याने भरला ६० लाख टॅक्स

लुधियाना: काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना बेरोजगारी दूर करण्यासाठी ‘पकोडे’ विकण्याचा सल्ला दिला होता. या सल्ल्यावरून पंतप्रधानांवर अनेक राजकारण्यांनी टीकेचे झोड देखील उठवली होती. परंतु आता पंजाब येथील लुधियाना मधील अश्याच एका ‘पकोडे’ विकणाऱ्याचा एक अजब किस्सा ऐकून अनेकांना आपणही असाच व्यवसाय सुरु करावा की काय असा प्रश्न पडू शकतो.
याबाबत सविस्तर वृत्त असे की लुधियाना येथे देव राज नामक एका व्यक्तीची भजी-पावची ‘पन्ना सिंग पकोडेवाला’ नावाने दोन उपहार गृह आहेत. सदर व्यक्ती आपल्या उपहार गृहामधून बक्कळ पैसे कमवत असल्याची माहिती आयकर विभागाला समजल्याने, आयकर विभागाने त्याच्या कमाई बाबत नोंदी घ्यायला सुरुवात केली. आयकर विभागाने केलेल्या निरीक्षणांनंतर सदर मालकास ६० लाख रुपये एवढा आयकर भरण्याचा आदेश देण्यात आला. देव राज यांनी देखील पुढील कारवाई टाळण्यासाठी आयकर भरून प्रकरणावर पडदा टाकला.
What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)