भारतीय दुताला पाकिस्तानचे समन्स

प्रक्षोभक गोळीबाराबद्दल नोंदवला निषेध

इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारने आज भारताच्या हंगामी उप उच्चायुक्तांना परराष्ट्र मंत्रालयात बोलावून घेऊन काल प्रत्यक्ष ताबारेषेवर केलेल्या प्रक्षोभक गोळीबार प्रकरणी निषेध नोंदवला. या गोळीबारात पाकिस्तानी हद्दीतील एका महिलेचा मृत्यू झाला आहे. प्रत्यक्ष ताबा रेषेनजिकच्या शहाकोट सेक्‍टर मध्ये भारतीय जवानांनी हा गोळीबार केला त्यात असियाबिबी नावाची पाकिस्तानी महिला ठार झाली असे त्यांचे म्हणणे आहे.

पाकिस्तानच्या सार्क विभागाचे महासंचालक मोहंमद फैजल यांनी सांगितले की प्रत्यक्ष ताबारेषेनजिक भारताकडून सातत्याने नागरी वस्त्यांवर गोळीबार केला जात असून त्यामुळे लोकांची सुरक्षा धोक्‍यात आली आहे. भारताने गेल्या वर्षभरात एकूण 2350 वेळा शस्त्रसंधी कराराचा भंग केला असून त्यात पाकिस्तानी हद्दीतील 36 नागरीक ठार झाले असून 142 जण जखमी झाले आहेत.

सन 2017 आणि 2018 या दोन वर्षात भारताने हा गोळीबार मोठ्या प्रमाणावर केल्याची माहितीही त्यांनी दिली. हे प्रकार थांबवण्यासाठी भारताने त्यांच्या हद्दीत संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा निरीक्षकांच्या नियुक्तीला अनुमती द्यावी अशी सुचनाही त्यांनी भारताला केली आहे. तथापी अशा निरीक्षकांची उपयुक्तता आता संपली आहे अशी भारताची भूमिका आहे असे त्यांचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)